

बयोज्
मायेची ओढ देई
लई मातीचा गंध,
झाडं पानांतूनी येई
अलगद सुगंध...
दुतर्फा डोलती झाडे
नागीण वळण घेत,
पुढे आपुलकीत आहे
बयोज् फार्मची भेट...
मस्त डोंगराच्या पायी
गर्द झाडांच्या गर्दीत,
श्वास मोकळा घ्या
आक्सिजन पानापानात..
शेतीची मौज येई
लगबगीनं गाव,
पहाटेच्या धुक्यात
पक्षी घेतील ठाव..
जणू खेडूत झोपडी
इथे सुख मिळेल रे,
या झोपडीत माझ्या
वर झगबगती तारे रे...






